Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना आता 24 तास सरकारी सुरक्षा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना आता 24 तास सरकारी सुरक्षा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या गृह विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या अवती भोवती 24 तास पोलीस असणार आहेत. मागच्या पाच ते सहा महिन्यांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळं त्यांच्या जिवाला कोणताही धोका होवू नये म्हणून जरांगे पाटलांच्या सुरक्षेची मागणी केली जात होती. त्यानुसार दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी जरांगे पाटलांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत.

मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दोन सशस्त्र पोलीस कर्मचारी जरांगे पाटलांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये जरांगे पाटलांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यांनी आपल्या उपोषण अस्त्राने सरकारला घाम फोडला. अखेर सरकारला जरांगेंच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आहेत. मध्यरात्री तब्बल 3 तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. दरम्यान, मुंबईत पोहोचण्याआधी पनवेल येथे आरक्षणाचा अध्यादेश जरांगेंच्या हाती देण्यात आला. आरक्षणाच्या चळवळीतला हा मोठा विजय मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com