Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाविरोधात बोलला की वाजवलाच समजा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाविरोधात बोलला की वाजवलाच समजा

साताऱ्यातून मनोज जरांगे पाटील बोलत होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

साताऱ्यातून मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, साताऱ्यात प्रचंड उन्हातही मराठ्यांची एकजूट आहे. आरक्षण न घेतल्याने आपल्या पिढ्या बरबाद झाल्या. मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही लढाई सामान्य मराठ्यांची आहे. शिक्षण, नोकरीमध्ये अडचण आल्याने लढा. मराठा आरक्षण मिळू नये म्हणून ओबीसी नेत्यांचा दबाव आहे. आरक्षण मिळालं असते तर मराठा जात प्रगत झाली असती.

गेल्या 70 वर्षांपासून मराठ्यांविरोधात षडयंत्र झाले. मराठ्यांची पोरं मोठी होऊ नये म्हणून षडयंत्र. पुरावे आता कसे काय सापडायला लागले याचे उत्तर द्या. सातारा जिल्ह्यात 20 हजार नोंदी. सरकार, समिती काम करत आहे. गाफील राहिल्यास मराठ्यांचे नुकसान होईल. सरकारने आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं. 24 डिसेंबरपर्यंत सरसकट मराठा आरक्षण मिळणार आहे. सत्तर वर्षांपासून नुकसान केले आहे.

आमचं आरक्षण असताना दिलं नाही. आपल्या मदतीला कुणीच नाही. अशी संधी पुन्हा येणार नाही. मराठ्यांनो संधीचे सोनं करा. एकही मराठा नेता आपल्या मागे उभा नाही. भुजबळांवर बोलणार नाही. भुजबळांना मराठ्यांनी किंमत देऊ नये. जातीय दंगली घडवण्याचा भुजबळांचा डाव. मराठ्यांनी बोलावं एवढे भुजबळ मोठे नाहीत. माझ्या टप्प्यात आला की मग बघतोच. तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कशी? भुजबळांना जातीय तणाव निर्माण करुन दंगली घडवायच्या आहेत. महाराष्ट्रातील लोकांचा पैसा भुजबळांनी ओरबाडला. जातीय दंगली होऊ द्यायच्या नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठ्यांविरोधात कळप एकत्र आलाय. भुजबळांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. या राज्यात शांतता राहिली पाहिजे. भ्रष्टाचारामुळे भुजबळांना जेलवारी. भुजबळ वयाप्रमाणे बरळू लागलेत. भुजबळांना आता मराठ्यांनी मत द्यायची नाहीत. भुजबळांना आता वय साथ देत नाही. मराठा आरक्षणाविरोधात बोलला की वाजवलचं समजा. अर्ध मंत्रिमंडळ आरक्षणाच्या बाजूने. मराठा ओबीसीतूनच येणार. दुसरीकडून आम्ही आरक्षण घेणार नाही. ज्या जातीचे पुरावे सापडले त्या जातीचे आरक्षण हवं. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com