पीएम मोदी मराठ्यांना ओबीसी करु शकले असते, पण...; जरांगेंचे टीकास्त्र

पीएम मोदी मराठ्यांना ओबीसी करु शकले असते, पण...; जरांगेंचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होती. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूसह विविध सेवांचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदींना सामान्यांशी घेणं-देणं नाही. ते मराठ्यांना ओबीसी करु शकले असते, असे जरांगे पाटीलांनी म्हंटले आहे. ते सिंदखेडराजा येथे बोलत होते.

पीएम मोदी मराठ्यांना ओबीसी करु शकले असते, पण...; जरांगेंचे टीकास्त्र
लोकसभा निकालानंतर भूकंप येणार; एकनाथ शिंदेंचं विधान

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदी सामान्यांशी काही घेणेदेणे नाही. ते मराठा ओबीसी करू शकले असते. पण त्यांनी ते केले नाही. परंतु, सामान्य काय करू शकेल हे त्यांना चांगल माहित आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. एकदा मोदींना आवाहन केलं होतं. पुन्हा-पुन्हा आवाहन करण्यासाठी आम्ही काय लेचेपेचे नाहीत, असेही जरांगेंनी म्हंटले आहे.

तसेच, राजकारण्यांना त्यांच्या राजकारणापुरता जिजामाता आणि छत्रपती आठवतात म्हणून आता आमचा मराठा समाज या विरोधात एकवटला आहे, असा अप्रत्यक्ष आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता जरांगेंनी केला आहे. मी आणि माझा समाज शांततेने आंदोलन करणार आहे. जाणार म्हणजे जाणार 20 जानेवारीला आणि आरक्षण आणणार, असा निर्धार त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com