माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे, हे त्यांचं म्हणणं बरोबर; राज ठाकरेंना जरांगे पाटलांचे उत्तर

माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे, हे त्यांचं म्हणणं बरोबर; राज ठाकरेंना जरांगे पाटलांचे उत्तर

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच. असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलं होतं की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी कल्याणमध्ये मराठा समाजाने आयोजित केलेल्या सभेत प्रतिक्रिया दिली आहे की, माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नसतो वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही. अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com