राजकारण
Marathwada Cabinet Meeting : मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज?
मराठवाड्यासाठी उद्या औरंगाबाद शहरात राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत.
मराठवाड्यासाठी उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. उद्या होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत जवळपास सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहे. यासाठी राहण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
तब्बल सात वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. कृषी विभागाने 600 कोटीचा प्रस्ताव मुख्यंमत्री कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे या बैठकीतून आता काय घोषणा होतात. याकडे लक्ष आहे.
या बैठकीत सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांचे पॅकेज जाहीर केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.