Marathwada Ministers Meeting : तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात होणार मंत्रिमंडळाची बैठक

Marathwada Ministers Meeting : तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात होणार मंत्रिमंडळाची बैठक

तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव सोहळा, संभाव्य नियोजित मंत्रीमंडळ बैठक, तसेच कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होत असलेली स्थिती याबाबत विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा बैठक झाली.

विभागातील प्रलंबित प्रश्न आणि टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी म्हणजेच 4 ऑक्टोबर 2016 रोजी औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक पार पडली होती. 2008 साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये मंत्री मंडळाची बैठक झाली होती. त्यानंतर आता तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक 16 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com