जत तालुक्यात एमआयडीसी उभारणार; उद्योगमंत्र्यांची माहिती

जत तालुक्यात एमआयडीसी उभारणार; उद्योगमंत्र्यांची माहिती

उद्योग मंत्री उदय सामंत आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय देसाई | सांगली : जत तालुक्यात एमआयडीसी सुरू करण्याबाबत येत्या आठ दिवसात मुंबईमध्ये बैठक आयोजित केली जाईल. शंभर हेक्टर जागेमध्ये एमआयडीसी उभा करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पाण्याबरोबरच रोजगाराबाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जत तालुक्यात एमआयडीसी उभारणार; उद्योगमंत्र्यांची माहिती
उदयनराजेंकडे वंशज असण्याचे दाखले मागणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये: राधाकृष्ण विखेपाटील

उदय सामंत म्हणाले की, अनेक वर्ष जतमधील लोक पाण्यापासून वंचित आहेत. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात लवकरात लवकर दुष्काळी जत तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिल जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच, प्रत्येक वाक्याचा वाईटच अर्थ होत नाही. गुलाबराव पाटील यांची भूमिका त्या मागची काही वेगळी असेल तर दोन्ही राज्यांमध्ये संबंध चांगले राहावेत यासाठी प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

सीमा भागाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. शंभूराज देसाई असतील किंवा चंद्रकांत पाटील हे प्रामाणिकपणाने सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील भूमिका मांडू. पण, ह्या ज्या काही गोष्टी चालू झालेल्या आहेत. कुठे बॅनर कुठे अजून काय हे मला असं वाटतं की दोन्ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. महाराष्ट्रातील जनता ही फार संयमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री यावर चर्चा करतील. दोन्ही आमचे मंत्री चर्चा करतील आणि कुठेही राज्यांमध्ये वादळ होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील, असे त्यांनी सांगितले.

जत तालुक्यात एमआयडीसी उभारणार; उद्योगमंत्र्यांची माहिती
पंतप्रधान म्हणून मोदी फक्त गुजरातला वेळ देतात : संजय राऊत

एमआयडीसीची घोषणा करताना उदय सामंत म्हणाले, दोन जमिनी या ठिकाणी आहेत. एक 24 एकर जमीन पिकवणे आणि दुसरी जमीन त्याच्यावर उद्योग नगरी उभारावी किंवा प्रकल्प उभारावे, अशा पद्धतीची येथील जनतेची मागणी आहे. त्याचा विचार मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलून नक्की करेल. व गरज पडल्यास पुन्हा इथे मला यावं लागलं. पंधरा-वीस दिवसांनी आचारसंहिता संपल्यानंतर मी पुन्हा येईल. परंतु येथील जनतेच्या मागण्यांबाबत शिंदे-फडणवीस सरकारी सकारात्मक आहे. लोकांच्या विकासासाठी व मागण्या पूर्ण करण्यासाठी वारंवार मी आणि भविष्यामध्ये मुख्यमंत्री येथे येतील, असेही सामंतांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com