ठाकरे गट, वंचित युतीनंतर मविआला युतीसाठी एमआयएमची खुली ऑफर; पण...
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली. या युतीमुळे आता राज्यातील राजकीय समीकरण बदलतील असे संकेत वर्तवण्यात येत आहे. या युतीची चर्चा होत असताना आता एमआयएमचे औरंगाबाद खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीनंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मोठी महिती दिली. लोकशाहीशी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमला युतीसाठी आणि मला इतर इतर पक्षातून ऑफर आल्या असता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला तयार आहे. मात्र, मुस्लिमांसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काय कामे केली हे दाखवा असे आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, आमच्यामुळे भाजपाला फायदा होतो, असे वाटत असेल तर चला आपण सोबत येऊ. मी या अगोदरही अशी ऑफर दिली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्यासोबत बसा. चर्चा करा. तुमच्यामुळे भाजपाला फायदा होत आहे. आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असे त्यांनी आम्हाला सांगावे. असेही जलील यावेळी म्हणाले.