Mim
Mim Team Lokshahi

लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला विरोध.., एमआयएमच्या अधिवेशनात ठराव

एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत अधिवेशन संपन्न.

नवी मुंबईत एमआयएमच्या पहिले दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या आजच्या समारोप वेळी पक्षाकडून अनेक ठराव घेण्यात आले. आगामी निवडणुकीच्या लक्षात यावेळी काही ठराव मांडण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोध असे काही ठराव मांडण्यात आले.

Mim
मोठी बातमी! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

यावेळी एमआयएम औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दलित मुस्लिम अत्याचार, हिंसाचार विरोधी आणि मुस्लिम आरक्षण देण्याची मागणी करणारा ठराव मांडला. तर माजी आमदार वारिस पठाण यांनी समान नागरी कायद्याला विरोध करणारा ठराव, तर सय्यद असीम वकार यांनी लव्ह जिहाद कायद्याला विरोध करणारा ठराव मांडला. त्यासोबतच एमआयएमचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनी वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि अतिक्रमण करणार्‍यांना बेदखल करण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणारा ठराव मांडला. यासोबतच या अधिवेशनात अनेक महत्वाचे ठराव मांडण्यात आले. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com