Raj Thackeray | Ajit Pawar | Sharad Pawar
Raj Thackeray | Ajit Pawar | Sharad PawarTeam Lokshahi

शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता...,अजित पवारांची नक्कल करत राज ठाकरेंनी सांगितले राजीनामा मागे घेण्याचे कारण

राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो संपला. मी निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांची रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. यासभेत बोलताना त्यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. अजित पवारांची नक्कल राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. यावेळी त्यांनी वादात असलेल्या कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावर देखील भाष्य केले.

मला पण ये तू गप्प बस तू असे म्हणतील

अजित पवारांची नक्कल करत ते म्हणाले की,राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो संपला. मी निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. समोर शरद पवार होते. तेव्हा लोकं म्हणाले, त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. यावेळी शरद पवार यांना खरचं राजीनामा द्यायचा होता, असं मला वाटतं. पण, राजीनामा दिल्यानंतर अजित पवार जे वागलेत. ये तू गप्प बस. ये तू शांत बस. माईक हातात घेतला. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत होत होतं. ते म्हणाले असतील मी जर खरच राजीनामा दिला तर हे मला पण ये तू गप्प बस तू असे म्हणतील. त्यामुळेच त्यांनी निर्णय मागे घेतला. अशी टीका त्यांनी अजित पवारांवर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com