Abdul Sattar
Abdul Sattar Team Lokshahi

उद्या सभागृह उत्तर देईल, आरोपानंतर मंत्री सत्तारांची प्रतिक्रिया

कृषी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याच्या दिलेल्या आदेशावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना, दुसरीकडे शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडत आहे. मात्र, या अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार कथित गायरान घोटाळ्यावरून अडचणीत सापडले आहेत. अधिवेशनात विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान घोटाळ्यावरून विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहे. विरोधकांकडून आता मंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या आरोपानंतर अब्दुल सत्तार नॉट रिचेबल होते. परंतु, आता मंत्री सत्तार यांनी एका वाक्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले आहे.

Abdul Sattar
कुणाच्या बापाची हिंमत नाही, का म्हणाले फडणवीस असं?

वाशिम जिल्ह्यातील 37 एकर जमीन मध्ये 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात केल्यानंतर अब्दुल सत्तार सध्या नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. तर यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली या संदर्भात उद्या मी सविस्तर सभागृहात बोलेल असं थोडक्यात विधान त्यांनी केले आहे. कृषी अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याच्या दिलेल्या आदेशावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर सत्तार यांनी केवळ मी लवकरच भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com