Maharashtra
Maharashtra Team Lokshahi

लव्ह जिहादमुळे बेपत्ता झालेल्या मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी पथक नेमणार, मंत्री लोढांची माहिती

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा मांडला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री व आमदार प्रवीण पोटे यांनी दिली आहे.

देशात सध्या श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या प्रचंड चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशाला या हत्याकांडाने हादरवून टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्वाची माहिती दिली. राज्यातल्या अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमणार असल्याचे त्यांनी यावेळी माहिती दिली.

Maharashtra
मनसे भाजप युतीला माझा विरोध आहे- रामदास आठवले

शुक्रवारी महिला आयोगाची एक बैठक झाली. त्या बैठीकीत राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बोलताना म्हणाले की, श्रद्धा वालकचे जे प्रकरण झाले आहे, त्यानंतर राज्यात महिला आयोगाने एक विशेष पथक नेमले पाहिजे. कुटुंबांच्या विरोधात जाऊन ज्या मुलींनी लग्न केले त्यानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबियांशी संपर्क तुटला आहे, त्यांची सध्या काय परिस्तिथी आहे. तसेच आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन ते एका व्यक्तीसोबत निघून गेल्या आहे. ज्यामुळे आपल्या कुटुंबियांना ते तक्रारही करत नाही. ज्या व्यक्तीसोबत त्या निघून गेल्या आहेत. त्या व्यक्तीला माहित आहे की, या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचे समर्थन नाही. म्हणून त्यांचे काय होत हे आपण श्रद्धा वाळकर प्रकरणातून पाहिले आहे. अशा मुलींना मदत करता यावी म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारीत

लव्ह जिहाद रोखण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात विशेष कायदा लागू करण्यात आला आहे. या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने देखील लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरु केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा मांडला जाणार असल्याची माहिती माजी मंत्री व आमदार प्रवीण पोटे यांनी दिली आहे. या नविन लव्ह जिहाद कायद्याअंतर्गत गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असणार आहे. असेही ते यावेळी मंत्री लोढा यावेळी म्हणाले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com