Ravindra Chavan
Ravindra Chavan Team Lokshahi

तेव्हा केलेलं पाप आता धूऊन टाका, डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यावरून मंत्री रवींद्र चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांंना उपहासात्मक सल्ला

मंत्री रवींद्र चव्हाण भाषणादरम्यान जोरदार टोलेबाजी

अमजद खान| कल्याण: एकीकडे एका दिवसात 28 किलोमीटर रस्ता तयार होतो दुसरीकडे आठ वर्षापासून कल्याण शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. यासाठी कोण जबाबदार आहे . एवढेच नाही तर डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांसाठी 472 कोटी निधी मंजूर करण्यात आली होती. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, ते थांबवण्यात आले आता निधी परत मंजूर करण्यात यावी आणि केलेले पाप धूऊन टाका असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगावला आहे. सरकारमधील एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. डोंबिवलीतील एका शाळेच्या खाजगी कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते.त्यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण भाषणादरम्यान जोरदार टोलेबाजी केली.

Ravindra Chavan
रामदास कदम शरीराने शिंदेंजवळ मात्र, मनाने ठाकरेंजवळच?

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सबंधित विभागाच्या अधिकऱ्यांना लक्ष केलं. डोंबिवली शहरातील रखडलेल्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, ६ वर्षापासून सुरु असलेला माणकोली पूल आणि ८ वर्षापासून सुरु असलेला कल्याण शिळ रोड या सारख्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. यावेळी बोलताना मंत्री चव्हाण यांनी गडकरी म्हणतात, एका दिवसात २८ किलोमीटचा रस्ता तयार होतो असं बोलतात. मात्र,आपल्याकडे काय होतेय याचा विचार आपण केला पाहिजे आणि कल्याण शीळ रोडला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली, त्याला आठ वर्षे झाली मात्र अजूनही कल्याण शिळ रोड तयार होत नाही. याला कोण जबाबदार आहे याचा विचार करायला पाहिजे , मी स्पष्ट बोलतोय कोणीतरी नंतर म्हणते की तुम्हालाच घरचा आहे. पण हे जे भावना आहे, हे लोकांचे ही कुणीतरी व्यक्त करायला हवी. असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला.

Ravindra Chavan
‘त्या’ निकषाने शिवसेनेलाच मिळणार शिवतीर्थावर परवानगी? सावंतांचा दावा

त्यावेळी केलेले पाप आता धुवून काढा – मुख्यमंत्र्यांना चव्हाण यांचा उपहासात्मक सल्ला

राज्यात भाजपची सत्ता असताना डोंबिवली शहरासाठी  ४७२ कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकारमधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली कोणाला ते माहित आहे.  पण वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला. ज्यांनी कोणी रद्द केला त्यांचीच हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत पहिल्यादा खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.प्रस्ताव पुन्हा सादर करा असं लिहिलं पण त्याला सुद्धा एक महिना झालाय. यामुळेच, त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका असा उपहासात्मक सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

खड्ड्यांसाठी ॲप तयार करणार

72 तासात खड्डे बुजवले गेले पाहिजे यासाठी तयार करणार नाही तर...अधिकारी जबाबदार

रस्त्यावरील खड्डे ७२ तासात बुजविले गेलेच पाहिजेत यासाठी लवकरच एक एप तयार करणार असून खड्डा पडल्यापासून ७२ तासात बुजविला गेला नाही तर त्यानंतर जे होईल त्याला तेच लोक जबाबदार राहतील. हा निर्णय केवळ सार्वजनिक बांधकाम खात्यासाठीच नव्हे तर त्याचे परिपत्रक काढून राज्यभरात लागू केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.डोंबिवलीतील ब्लॉसम इंटरनशनल स्कूलने तयार केलेल्या अद्ययावत ऑडीटोरीयमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Lokshahi
www.lokshahi.com