Sandipan Bhumare | Ajit Pawar
Sandipan Bhumare | Ajit PawarTeam Lokshahi

अजित पवारांच्या त्या टीकेवर भुमरेंचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भल्या पहाटे शपथ...

अजित पवार ज्यांच्या घरी आज चहा पिण्यास गेले त्यांची सुद्धा परमिट रूम आहे दारूची दुकाने आहेत.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सर्व गदारोळ सुरु असताना औरंगाबादमध्ये सभे दरम्यान राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यावर दारूच्या दुकानावरून सडकून टीका केली होती. दारूची दुकान असणारा नेता काय लोकांचं भलं करेल असा सवाल करत अजित पवार यांनी भुमरेंना डिवचले होते. आता त्याच टीकेला भुमरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sandipan Bhumare | Ajit Pawar
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी व्हावे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काय दिले भुमरेंनी प्रत्युत्तर?

अजित पवारांकडेच दारुचे कारखाने असल्याचा पलटवार मंत्री संदिपान भुमरे यांनी केला आहे. अजित पवारांनी विचार करून बोलावं असं भुमरेंनी म्हंटल आहे. महाविकास आघाडी आम्हाला न पटणारा विषय होता. खरी गद्दारी अजित दादा पवार यांनी केली भल्या पहाटे शपथ घेतली. त्याचबरोबर रेडा हा शब्द अजित पवारांच्या तोंडून शोभत नाही. याच रेड्यानं तुम्हाला घरी बसवलं. अशी टीका भुमरेंनी केली आहे.

पुढे भुमरे म्हणाले की, पैठण मधील कारखाना राष्ट्रवादीने बंद पडला होता तो मी चालू केला. अजित पवार ज्यांच्या घरी आज चहा पिण्यास गेले त्यांची सुद्धा परमिट रूम आहे दारूची दुकाने आहेत. तूम्ही किती सभा घ्या पैठणला बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच आमदार निवडून येईल.असे जोरदार प्रत्युत्तर भुमरेंनी यावेळी दिले आहे.

Sandipan Bhumare | Ajit Pawar
तब्बल 21 महिन्यानंतर देशमुख नागपुरात, भावुक होऊन म्हणाले, मी माझ्या...

काय म्हणाले होते अजित पवार?

पैठणच्या सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होती की, 'ये दारू,पी दारू' असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये भुमरेंना डिवचले होते. भुमरे यांनी मतदारसंघात विकासकामे करण्यापेक्षा दारूच्या दुकाने थाटण्याचे कामं केल्याचं आरोप अजित पवार यांनी केला. गिऱ्हाईकांचे लक्ष जावे म्हणून या दारुच्या दुकानांसमोर स्पीडब्रेकर लावल्याचा आरोपही अजित पवारांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com