Bacchu kadu
Bacchu kaduTeam Lokshahi

कायद्यानुसार शिंदेंकडून सर्व कागदपत्र तयार..., बच्चू कडुंचे मोठं विधान

14 फेब्रुवारीला म्हणजे उद्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये नियमित सुनावणी होणार आहे. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात सात महिन्यांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. शिवेसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळी वाट धरली. त्यामुळे पक्षासह महाराष्ट्राच्या राजकारणात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले, तेव्हापासून या दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जातोय. दरम्यान एका निवडणुकीसाठी या दोन्ही गटांना चिन्ह आणि नाव देण्यात आले, परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचं याबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यापासून निर्णय प्रलंबित आहे. पण आता 14 फेब्रुवारीला म्हणजे उद्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये नियमित सुनावणी होणार आहे. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिन्हापेक्षा मत कोणाला आहे हे महत्त्वाचं असते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मजबूत तयारी असून त्यांच्याकडे परिपूर्ण कागदपत्र आहे. अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिलीय.

Bacchu kadu
फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर अशोक चव्हाणांचे विधान; म्हणाले, लपून छपून राजकारण...

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

उद्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीबाबत माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, सत्तासंघर्षाच्या सुनावणीत भावनेवर निर्णय होत नाही तर तो कागदावर होत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्याच बाजूनं निर्णय लागेल असा विश्वास आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय. मी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो. पतंग, विमान, नारळ आणि कपबशी अशी वेगवेगळी चिन्हं मला मिळाली. पण शेवटी माणूस महत्त्वाचा असतो. चिन्हं कुणालाही मिळालं तरी काही फरक पडणार नाही. पण लोकांना वाटतं की, हे चिन्हं आम्हाला भेटलं पाहिजे. असे विधान त्यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मजबूत तयारी केलीच आहे. परिपूर्ण कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. न्यायालयात भावनेवर निर्णय होत नसतात. ते निर्णय कागदावर होतात. कारण आपण कागदाला महत्त्व देतो. उद्या मी न्यायालयात जाऊन लढलो, तर तो निर्णय माझ्या बाजुने लागणार नाही. तुमच्याकडे कागदं कोणती आहेत. ते कायद्याच्या चौकटीत बसतात का? हे कोर्ट पाहतं. कायद्याच्या चौकटीत बसण्याच्या सोयीची कागदपत्रे तयार झाले असतील, तर निश्चितच निर्णय त्यांच्या बाजुने लागेल, असा विश्वास बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केला.

अशी होणार उद्या सुनावणी

शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यापासून निर्णय प्रलंबित आहे. पण आता 14 फेब्रुवारीला म्हणजे उद्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये नियमित सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापिठापुढे ही सुनावणी होणार आहे. घटनापिठात न्याय. शहा,न्याय. मुरारी,न्याय. हिमा कोहली आणि नाय. नार्सिंमा यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com