Bacchu Kadu
Bacchu KaduTeam Lokshahi

पुढील वर्षीचं बजेट हे हिंदीमधून आलं पाहिजे, बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी

उद्या जर आपल्या राज्याचा अर्थसंकल्प हिंदीमधून मांडला तर? राज्याचं काय होईल. म्हणून या देशाच्या संसदेत जे काही शब्द निघतात ते सामान्य माणसाला सरळ समजले पाहिजेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. जच्या या अर्थसंकल्पावर सर्वच देशाचे लक्ष लागून होते. त्यावरच आता बजेट सादर झाल्यानंतर या बजेटवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. आरोप- प्रत्यारोप सुरु असताना आता प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्प मांडण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

Bacchu Kadu
अर्थसंकल्पावर भाष्य करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नेमकं कशावर बच्चू कडू यांनी नाराजी?

अर्थसंकल्पावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे लोकांना या सरकाचा आरसा असतो, ते तुम्ही द्या. अर्थसंकल्पीय भाषणाचे अनेक किस्से असेच आहेत, की भाषण खूप मोठे असते कृतीमध्ये किती येते, आणि ते महत्त्वाचं आहे. म्हणून यामध्ये काही समाधानकारक गोष्टी आहेत. अर्थसंकल्प अतिशय चांगला आहे, कोरडवाहू शेतकऱ्याचा भाग सुटलेला आहे. बेघरांच्या घरांचा भाग सुटलेला आहे. मजुरांचा भाग सुटलेला आहे. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी फार अशी तरतूद दिसत नाही. अशी देखील खंत त्यांनी यावेळी वक्त केली.

पुढे ते म्हणाले की, सगळ्यात मोठी दु:खाची गोष्ट अशी आहे, की अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला आहे. परंतु, ज्या भाषिकांनी तुम्हाला निवडून दिले त्या भाषेत तुम्ही सभागृहात बोलले पाहिजे. जेणेकरून सामान्य माणसाला ते समजेल. म्हणून पंतप्रधान मोदींना आम्ही पत्र लिहिणार आहोत की पुढील वर्षीचं बजेट हे हिंदीमधून आलं पाहिजे. कारण, आपण या देशाच्या संस्कृतीचे पुरस्करते आहोत. भाजपा म्हटलं की लोकांच्या डोक्यात येते हा संस्कृती चालवणारा पक्ष आहे. या देशाची भाषा इंग्रजी नाही. उद्या जर आपल्या राज्याचा अर्थसंकल्प हिंदीमधून मांडला तर? राज्याचं काय होईल. म्हणून या देशाच्या संसदेत जे काही शब्द निघतात ते सामान्य माणसाला सरळ समजले पाहिजेत.

तुम्ही अर्थसंकल्प इंग्रजीमधून मांडल्याने राष्ट्रभाषेचा अवमान झालेला आहे. या अवमानाची दुरुस्ती आपण केली पाहिजे, पुढीलवेळी तुम्हाला जर हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून तो अर्थसंकल्प सादर करा. नाहीतर माफी मागून तरी इंग्रजी बोला. कारण आम्ही राष्ट्रप्रेमी लोक आहोत. राष्ट्र प्रथम वंदे मातरम्. म्हणू याची सुधारणा लोकसभेत झाली पाहिजे, अशी विनंती सुद्धा मी या निमित्त करतो. अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com