आमदार केचे व कुणावरांनी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर मारला डल्ला

आमदार केचे व कुणावरांनी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर मारला डल्ला

आर्वी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याच्या अध्यक्षपदी आमदारांची निवड; भाजप कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर

भूपेश बारंगे | वर्धा : राज्यात फडणवीस व शिंदे सरकार येताच तडकाफडकी जिल्ह्यात वेगवेगळ्या समित्यांवर जवळपास साडेतीनशे भाजप कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी 'कही खुशी कही गम' असे भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे. जिल्हा स्तरीय व तालुकास्तरीय 34 समित्या राज्याचे उपमुख्यमंत्री व वर्ध्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समित्या जाहीर केल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.

आमदार केचे व कुणावरांनी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर मारला डल्ला
उध्दव ठाकरेंच्या भाषणाला तासभर न होताच दीपक सावंतांनी सोडली साथ; शिवसेनेत प्रवेश

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदावर वर्धा जिल्ह्यातील दोन आमदारांची निवड केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. हिंगणघाट मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांनी स्वतःकडे संजय गांधी निराधार योजनेचे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्याचे अध्यक्ष पदी निवड झाली आहे.तर आर्वी मतदारसंघाचे आमदार दादाराव केचे यांची आर्वी तालुक्यासाठी अध्यक्ष पदी निवड झाली आहे.यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी आमदारांनी डल्ला मारल्याने भाजप पक्षातील कार्यकर्त्यांत नाराजी सुरू ऐकायला येत आहे. जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना, वृद्ध कलावंत, परिवहन,दक्षता, विद्युत कंपनी व इतर जिल्हा व तालुका स्तरीय समित्या आहेत.

राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता आली, तर सर्वसामान्य कार्यकर्त्याना आनंद होतो.या सत्ते पक्ष आपल्याला कुठेतरी स्थान देणार असे कार्यकर्त्याना वाटते. आपल्या परिसरातील जनतेचे आपण यातून काही कामे मार्गी लावू असा सामान्य कार्यकर्त्याना वाटते.या समित्यावर तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. त्यात भाजपचे आमदार समीर कुणावार व आमदार दादाराव केचे यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष स्वतःकडे ठेवल्याने मतदारसंघात मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आमदारच झाले निराधारांचे अध्यक्ष

संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पद आम्हाला मिळाव यासाठी अनेक पक्षातील कार्यकर्ते पक्षांशी प्रामाणिक राहून पक्षासाठी झटत असतात.एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांची या पदी निवड झाली तर त्याचा आनंद मावेनासा होतो.अनेक कार्यकर्त्यांना वाटते की या पदी आपली वर्णी लागेल. मात्र याठिकाणी भाजपच्या आमदारांची अध्यक्ष पदी निवड केल्याने भाजप पक्षातील कार्यकर्त्यांत कुजबुज सुरू असल्याचे दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com