Prashant Bamb
Prashant Bamb Team Lokshahi

शिक्षकांचा मोर्चा हा बेकायदेशीर, शिस्त भंगाची कार्यवाही झाली पाहिजे - आमदार बंब

शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार या जागा आता रद्द केल्या पाहिजेत, बंब यांचे विधान

पावसाळी अधिवेशात भाजप आमदार प्रशांत बंब शिक्षकांचा मुख्यालयात राहण्याचा विषय काढल्यानंतर शिक्षक आणि बंब यांच्यात वाद निर्माण झाला. बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये आज शिक्षकांनी मोर्चा काढला होता. औरंगाबादच्या हमखास मैदानावरती शिक्षकांचा हा मोर्चा निघाला. हजारो शिक्षक प्रशांत बंब यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले. शिक्षकांच्या समर्थानात शिक्षक आमदारांनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. शिक्षकांच्या आंदोलनानंतर लगेच प्रशांत बंब यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदमध्ये शिक्षक आणि शिक्षक आमदारांचा चांगलाच समाचार बंब यांनी घेतला.

Prashant Bamb
‘भारत जोडो' यात्रेत महिलेने राहुल गांधींसमोर ठेवला चक्क लग्नाचा प्रस्ताव

माध्यमांशी बोलताना बंब म्हणाले की, शिक्षकांचा मोर्चा हा बेकायदेशीर होता. त्यांच्यावर शिस्त भंगाची कार्यवाही झाली पाहिजे. शिक्षक आणि पदवीधर आमदार हे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहेत. हे आमदार शिक्षकांच्या जीवावर निवडून येण्यासाठी खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप आमदार बंब यांनी केला आहे.

शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार या जागा आता रद्द केल्या पाहिजेत. मी शिक्षणाचे खाजगीकरण करत नाही माझी एकही शाळा नाही. उलट याच शिक्षक आमदारांनी स्वतः शाळा उघडल्या आहेत. यांनीच संस्था काढल्या आहेत, राजकारणी लोक आमदार असून संस्था शाळा कशा काय उघडू शकतात, याच लोकांनी शिक्षणाचे खाजगीकरण केलं आहे. संस्थांच्या नावावर सरकारी तिजोरीतील पैशांवर डल्ला मारला आहे. असे गंभीर विधान त्यांनी शिक्षक आणि पदवीधर आमदारांवर यावेळी केला.

Prashant Bamb
दादर राडा प्रकरणातील शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक, शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र...

मी फक्त पाटी लावण्यासाठी चार चार वेळा आमदार नाही

मी जनतेच्या चांगल्यासाठी भूमिका घेतली आहे. मला काय आमदारकी चाटायची नाही, मी फक्त पाटी लावण्यासाठी चार चार वेळा आमदार होणार नाही. असे विधान करत त्यांनी विक्रम काळे आणि सतीश चव्हाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी कधीही शिक्षकांचे प्रश्न सोडवले नाहीत. तिजोरीतील सगळे पैसे शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात, त्यामुळे राज्यावर आर्थिक बोजा पडत आहे. जिल्हा परिषद शिक्षणाची वाताहत झाली आहे. येथील शिक्षक मुलांना उत्तम दर्जाचे शिक्ष दिले जात नाही. यामुळेच आमदार आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवत नाहीत. कोणत्याही 20 शाळा निवडाव्या आणि येथील शिक्षणाचा दर्जा तपासावा. यांनतर जे सत्य समोर येईल त्यांनंतर शिक्षकांना मुख्यालयी राहवे ही मागणी मी मागे घेऊन असे आव्हान बंब यांनी दिले.

Lokshahi
www.lokshahi.com