Satyjeet Tambe
Satyjeet TambeTeam Lokshahi

'मला माफी मागायला लावली' तांबेंचा मोठा गौप्यस्फोट

पाकिट फोडलं तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं समोर आलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात नुकताच शिक्षक आणि पदवीधर निवडणुक पार पडली. पाच जागांसाठी ह्या निवडणुका झाल्या. परंतु, सर्वात जास्त चर्चेत आला. तो म्हणजे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ या जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला होता. त्या ठिकाणी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भराला. परंतु, दुसरीकडे भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे सत्यजित तांबे हे भाजपचे उमेदवार आहे, अशी चर्चा रंगली देखील होत्या. आता सत्यजित तांबे हे त्याठिकाणी विजयी झाले असुन आज त्यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या वादावर भाष्य केले आहे. यावेळी बोलत असताना तांबेंनी मोठा गौप्यस्फोट केला.

Satyjeet Tambe
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अदित्य ठाकरेंच्या त्या आव्हानाला शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

काय म्हणाले सत्यजित तांबे?

वडील डॉ. सुधीर तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी निवडणूक लढवणार असा आम्ही निर्णय घेतला. त्यानंतरही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून दोन वेळेला चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आल्याचं सत्यजित तांबे यांनी सांगितलं. ते म्हणाले, ९ जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून प्रदेश कार्यालयाला संपर्क केला. त्यानुसार १० तारखेला माझा माणूस नागपूरला पोहोचला. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो बसून राहिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला. दोन एबी फॉर्म घेऊन पाठवतोय. विधान परिषदेचे एबी फॉर्म असल्याने ते सीलबंद होते. 11 तारखेला सकाळी माणूस पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यावर डॉ. सुधीर तांबे यांचं नाव होतं. पर्यायी उमेदवाराचं नावाच्या ठिकाणी नील होतं. पाकिट फोडलं तेव्हा चुकीचे एबी फॉर्म पाठवल्याचं समोर आलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे ते फॉर्म नव्हते. एक औरंगाबादचा आणि दुसरा नागपूर शिक्षक मतदार संघाचा फॉर्म असल्याचं कळलं. एबी फॉर्मसारखा महत्त्वाचा मुद्दा एवढा प्रदेश कार्यालयानं गहाळपणे का करावा?, असा सवाल सत्यजित तांबे यांनी केलाय.

नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही

पुढे ते म्हणाले की., एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही.

"मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावलं. त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केलं, त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो. पण एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही." असे देखील तांबे यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com