राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक आक्रमक; कंत्राटदारचे फोडले कार्यालय

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक आक्रमक; कंत्राटदारचे फोडले कार्यालय

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. आज मनसेच्या निर्धार मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर राज ठाकरेंनी टीका केली.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

रायगड : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. आज मनसेच्या निर्धार मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर राज ठाकरेंनी टीका केली. आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे, असे आवाहन राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना केले होते. यानंतर माणगावमधील पहिल्या कंत्राटदारांचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले आहे.

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक आक्रमक; कंत्राटदारचे फोडले कार्यालय
राज साहेबांनी समजून घ्यावे; का म्हणाले संजय शिरसाट असं?

राज ठाकरेंनी माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे, असे म्हंटले होते. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्या मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. तर, माणगाव मधील चेतक व सन्नी कंपनीचे कार्यालयही मनसे स्टाईलने फोडण्यात आले आहे.

दरम्यान, २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी सरकारवर केली होती.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com