MNS
MNSTeam Lokshahi

नव्या दमाने, नव्या आयुधांसह.. मनसेच्या वर्धापन दिनाचा टीझर जारी

येत्या 9 मार्च रोजी मनसेचा 17 वा वर्धापन दिन.
Published by :
Sagar Pradhan

मागील आठ महिन्यांत राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी झाली त्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआचं सरकार कोसळलं. परंतु, आता शिवसेना नाव आणि पक्ष देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेले. एवढ्या सगळ्या घडमोडी घडल्या परंतु, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप सविस्तर अशी भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आता येत्या 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून त्या दिवशी राज ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याच वर्धापन दिनाचा आता मनसेनी टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे वर्धापनदिनी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MNS
"उद्यापासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं" बावनकुळेंची विरोधकांना आवाहन

काय आहे त्या टीझरमध्ये?

मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा टीझर प्रसिद्ध केला. या मध्ये त्यांनी मनसेच्या काही महत्वाच्या आंदोलनाचे दृश देखील दाखवले आहेत. सोबतच राज ठाकरे यांचे भाषणाचे काही मोजके क्षण देखील घेतले आहे. यामध्ये त्यांनी 'नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज' असे ब्रीद वाक्य देखील टाकले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या वर्धापन दिनी काय नवीन घोषणा करणार याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com