मनसे महायुतीत? मुंबईत शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये बैठक सुरु

मनसे महायुतीत? मुंबईत शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये बैठक सुरु

मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये ही बैठक होत असून या बैठकीला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. तसेच काल रात्री देखील राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती मिळत असतानाच आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होत आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड्समध्ये ही बैठक होत असून या बैठकीला देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत.

लोकसभेच्या दोन जागांसाठी मनसे आग्रही असल्याचं समजते. हॉटेलच्या १९ व्या मजल्यावर ही बैठक सुरु असून जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com