महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात; मनसेचे टीकास्त्र

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात; मनसेचे टीकास्त्र

मनसे नेते संदीप देशपांडे यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात आहे, असा घणाघात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच, कोरोना काळातील टेंडरवरुन त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावरही आरोप केले आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात; मनसेचे टीकास्त्र
आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय केलं; महाजनांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संदीप देशपांडे म्हणाले की, एखाद्या कामाची चौकशी का होऊ शकत नाही. तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल, तर घाबरता कशाला? पालिका आयुक्तांमध्ये एवढी हिंमत कशी येते. भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करू नका, असा कोणता कायदा आहे. इक्बालसिंह चहल खोटं बोलत आहेत. त्यांनी आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित लोकांना काम कशी मिळाली? इक्बालशिंह चहल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम केली जात होती, असा आरोप त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात; मनसेचे टीकास्त्र
'लिटील-लिटील' हे सूत्र सुरक्षित नाही; WHO चा गंभीर इशारा

कॅगची चौकशी केल्यावर जो दोषी आढळेल, त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर मनसे आपल्या पद्धतीने शिक्षा देईल, भर रस्त्यात चोप दिला जाईल, असा मनसे स्टाईल इशाराच संदीप देशपांडेंनी दिला आहे. तसेच, आघाडीचे नेते फक्त मंदबुद्धी नाहीत असं नाही तर त्यांचा मेंदूच गुडघ्यात आहे, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com