राजकारण
आणि महाराष्ट्राचा 'दहीहंडी' सण टिकला...; असे म्हणत मनसेनं केलं ट्विट
राज्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
राज्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज मानाच्या हंड्या फोडण्याचा मान कोणतं मंडळ जास्त पटकावणार, सर्वात जास्त मानवी थर लावण्याचा मान कोणत्या मंडळाला जाणार, अशा अनेक गोष्टींसाठी आज गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींकडे आज सगळ्यांचे लक्ष लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मनसेनं ट्विट केलं आहे. मनसेनं ट्विट करुन म्हटले की, हिंदूंच्या 'कृष्णजन्माष्टमी' निमित्त साजरा होणाऱ्या 'दहिहंडी' या मराठी सणावर बंदी आणण्याचा डाव रचला गेला होता तेव्हा एक 'राज'गर्जना झाली... मराठी मनगटं एकवटली, निकराने लढली आणि महाराष्ट्राचा 'दहीहंडी' सण टिकला...! असे म्हटले आहे.
Admin