राजकारण
दादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे आमदार कुठे बसले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पक्षप्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विरोधी बाकांवर बसण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अनिल पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद म्हणून पक्षातील आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आता कोणते आमदार कुठे बसणार आणि कुणाला कुणाचा व्हीप लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दादांच्या बंडानंतर विधानसभेतील आसन व्यवस्थेत बदल झाला. अजितदादा गटाचे मंत्री आणि आमदार भाजपाच्या बाकावर बसलेले पाहायला मिळाले. अजित पवार गटाचे मंत्री, आमदार सत्ताधारी बाकावर बसले. तसेच भाजपाचे मंत्री ठाकरे गटाच्या बाकावर बसले होते. काँग्रेस-शरद पवार गटाचे आमदार मात्र एकाच बाकावर पाहायला मिळाले.