Amaravati
AmaravatiTeam Lokshahi

खासदार नवनीत राणा राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू-मुस्लिमांचा वाद लावत आहे- एमआयएम

खासदार नवनीत राणांच्या लव्ह जिहादच्या आरोपानंतर अमरावती एमआयएम आक्रमक

सूरज दाहाट|अमरावती: आंतरधर्मीय विवाहाचा प्रकरण चांगलच तापलेला आहे, चार दिवसांपूर्वी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नवनीत राणा यांनी राडा घालत एका मुस्लिम तरुणाने हिंदू मुलीला पळवून नेल असा आरोप केला होता. मात्र सदर तरुणीला पोलीस ठाण्यात आनल्यानंतर तिने मी स्वतःहून घरून निघून गेली होती, मला कोणीही पळवून नेलं नव्हतं. असं तिने सांगितल्यानंतर या प्रकरणाची पूर्णपणे हवा निघाली होती. यानंतर मात्र नवनीत राणा यांच्यावर सर्व स्तरावरून टीका व त्यांचा निषेध सुद्धा होतो आहे.

दरम्यान, आज अमरावतीत चांगलीच आक्रमक झाली असून त्यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना निवेदन देत नवनीत राणावर गंभीर आरोप केले. खासदार नवनीत या राजकीय पोळी शेकण्यासाठी हिंदू-मुस्लीमात वाद लावत आहे, लव्ह जिहादचा खोटा आरोप आखून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. असा आरोप देखील एमआयएमने खासदार नवनीत राणा यांच्यावर केला, तसेच लव्ह जिहादच्या आरोपावर भाजप व काही पक्षा कडून मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. तसेच अमरावती दंगल नंतर अनिल बोंडे, नवनीत राणा व आमदार प्रवीण पोटे यांना का तडीपार केलं नाही. असंही एमआयएमने म्हटलं आहे. लव्ह जिहाद, हनुमान चालीसामुळे अमरावती शहराचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे अमरावती शहराची व जिल्ह्याची बदनामी थांबवावी असे आव्हान एमआयएमने केलं.

नवनीत राणा यांच्या विरोधात भीम आर्मी संघटना रस्त्यावर

नवनीत राणा यांनी लव्ह जिहादच्या प्रकरणावरून आपला कॉल रेकॉर्ड केला जातो. यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात चांगलाच राडा केला होता. आता हे प्रकरण नवनीत राणा यांना चांगलाच महागात पडणार अस दिसत आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात आज भीम आर्मी संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला या प्रकरणात नवनीत राणा यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच मी दलित आहे हा वारंवार आरोप करून पोलिसांवर त्यात आरोप करतात त्यामुळे दलित शब्द नवनित राणा यांनी टाळावा असही भीम आर्मीने म्हटलय. दरम्यान, या मोर्चात मोठ्या प्रमाणात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या

Lokshahi
www.lokshahi.com