राजकारण
Rahul Gandhi हॉटेलमधून पडले बाहेर; मुंबईत नेमकं कुठे गेले राहुल गांधी?
काँग्रेसचे राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सध्या मुंबईत आले आहेत.
काँग्रेसचे राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सध्या मुंबईत आले आहेत. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. आज सकाळी राहुल गांधी हॉटेलमध्ये आहेत. मात्र ते नेमकं कुठे गेलेत किंवा कुणाची भेट घेणार आहेत. याबद्दल कुणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे आता राहुल गांधी कुणाची भेट घेणार आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीचा आजचा महत्वाचा दिवस आहे. आज इंडिया आघाडी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी लोगोची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज या बैठकीत जागावाटप, किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे. दुपारी 3.30 वाजता इंडिया आघाडीतील नेते पत्रकार परिषद घेणार आहेत.