Sudhir Mungantiwar | Vijay Wadttiwar
Sudhir Mungantiwar | Vijay WadttiwarTeam Lokshahi

वडेट्टीवारांच्या विधानावर मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर म्हणाले, महाराजांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका...

जगदंबा तलवारीसोबत राज्यात उद्योगही आणा असा खोचक सल्ला वडेट्टीवारांनी राज्य सरकारला दिला होता.

शिंदे- फडणवीस सरकार लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार' महाराष्ट्रात परत आणणार आहे. ही शिवरायांची 'जगदंबा तलवार' परत मिळवण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार आहेत. भाजप नेते व राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुनगंटीवार यांच्या या भूमिकेवर माजी मंत्री तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र चिमटे काढले आहेत. तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक सल्ला वडेट्टीवारांनी दिला आहे. त्यावरच आता मंत्री मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसवर टीका केली आहे.

Sudhir Mungantiwar | Vijay Wadttiwar
मला कुंकुवाची अ‍ॅलर्जी; अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

काय दिले मुनगंटीवार यांनी उत्तर?

जगदंबा तलवार परत आणण्याचा विषयावरून वडेट्टीवार यांनी " तलवारी सोबत उद्योगही आणा " असा सल्ला मंत्री मुनगंटीवार यांना दिल्यानंतर मुनगंटीवार यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका नेहमीच आक्षेप घेणारी राहिली आहे. राज्य शासनाकडून रोजगार दिल्या जातो असे मुनगंटीवार म्हणाले.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

जगदंबा तलवार परत आणण्याचा मुनगंटीवार यांचा विधानावर वडेट्टीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल. मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांचे हातचे काम गेलं. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाल. तलवार आणत असताना तलवारी सोबत उद्योगही आणा. बेरोजगाराच्या हातांना काम मिळणं हे ही तेवढेच महत्त्वाचा आहे. असा चिमटा वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला काढला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com