अमरावतीत मविआचा फडणवीसांना धक्का!  धीरज लिंगाडे विजयी

अमरावतीत मविआचा फडणवीसांना धक्का! धीरज लिंगाडे विजयी

तब्बल 30 तासानंतर अमरावती पदवीधरचा अखेर निकाल समोर

अमरावती : अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. नागपूर पाठोपाठ अमरावतीत सुद्धा देवेंद्र फडणीसांना धक्का बसला आहे. तब्बल 30 तास झालेल्या मतमोजणीनंतर मविआ उमेदवार धीरज लिंगाडे यांनी मैदान मारले आहे. भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. यामुळे भाजपचे विद्यमान आमदार रणजीत पाटलांची हॅट्रिक हुकली.

अमरावतीत मविआचा फडणवीसांना धक्का!  धीरज लिंगाडे विजयी
आता प्रजा आणि राजा कोण? हे जनतेने दाखवून दिलं; पटोलेंचा भाजपवर निशाणा

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारपासून मतमोजणी सुरु होती. सुरुवातीपासूनच धीरज लिंगाडे आघाडीवर होते. यामुळे भाजप उमेदवार डॉ. रणजित पाटील यांच्या प्रतिनिधींनी अवैध मतांची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली होती. 8 हजार 735 अवैध मतांची पुन्हा पडताळणी झाली. परंतु, कोणत्याच उमेदवारांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजली गेली. यानंतर अखेर 30 तासांनंतर धीरज लिंगाडे यांना विजयी घोषत केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com