महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा भाजपचा प्रयत्न; नाना पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा भाजपचा प्रयत्न; नाना पटोलेंचा घणाघात

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

नागपूर : मराठा आरक्षणाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली. परंतु, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला असून जीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राला सुद्धा मणिपूर करण्याचं प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा घणाघात पटोलेंनी केला आहे.

महाराष्ट्राला मणिपूर करण्याचा भाजपचा प्रयत्न; नाना पटोलेंचा घणाघात
कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

भाजपने त्या काळात चूक केली आहे. सत्तेसाठी काहीपण ही भाजपची भूमिका आता त्यांच्या अंगलट येत आहे. बंजारा समाजाला, मराठयांना आश्वासन देऊन सत्तेत आले. मोर्चे निघाले पण न्याय देऊ शकले नाही. महाराष्ट्राला सुद्धा मणिपूर करण्याचं प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मराठा समाजाची 16 टक्के आरक्षण मागणी होती. ओबीसी-मराठा आता भांडण लावण्याचा काम होत आहे. ओबीसी आग आहे, यात सरकारने पडू नये. जातीनिहाय जनगणना हा यावर उपाय आहे. भाजप त्याला विरोध करत आहे, असे नाना पटोलेंनी म्हंटले आहे.

काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. रायपूरला ठराव करुन घेतला. आम्ही जातीनिहाय जनगणना करू, सेन्सेस झालं पाहिजे. भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, इंग्रजांची भूमिका भाजप वठवत आहे. आपसात भांडण लावत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com