Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान मध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचे म्हणत, नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे
Published by :
Dhanshree Shintre

नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी लावत, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस ही पाकिस्तानची B टीम असल्याच्या वक्तव्यावर नाना पाटोले यांनी मोदींवर पलटवार करत चांगलाच निशाणा साधला आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात पाकिस्तानची आठवण काढणं म्हणजे नरेंद्र मोदींच्या पायाखालची जमीन सरकली असल्याच म्हणाले. नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान मध्ये जाऊन खाल्लेल्या बिर्याणीची आठवण येत असल्याचे म्हणत, नाना पटोले यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानावर बोलताना म्हणाले की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीच्या शंभर टक्के जागा पुढे असून, तिसऱ्या टप्प्यात आजच्या दिवशी देखील महाविकास आघाडी पुढे आहे आणि चौथ्या टप्प्यात देखील महाविकास आघाडी पुढे असल्याचे चित्र असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

पवार कुटुंबियांच्या पारिवारिक वादात काँग्रेसला पडायचं नाही आणि त्यांच्याशी आम्हाला कुठलंही घेणं देणं नाही असं म्हणत नाना पटोले यांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन घेतलेल्या भेटीवर बोलताना मत व्यक्त केल आहे. गेल्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने केलेल्या विकासानंतर भाजपने दहा वर्षात फक्त विकण्याचं काम केलं असल्याचा आरोप नाना पटोले यांनी लावत भाजपवर निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com