...नाहीतर ईडी अजित पवारांना येडं करेल; नाना पटोलेंचे टीकास्त्र

...नाहीतर ईडी अजित पवारांना येडं करेल; नाना पटोलेंचे टीकास्त्र

इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यावेळी पटोलेंनी अजित पवारांच्या बीड येथील सभेवर टीकास्त्र डागले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईत होणाऱ्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यावेळी पटोलेंनी अजित पवारांच्या बीड येथील सभेवर टीकास्त्र डागले आहे. महाराष्ट्र संस्कृतीला न शोभणार काल कृत्य बीडच्या सभेत झाला आहे. ज्यांना राजकारणात मोठं केलं तेच टीका करतात. बाप होता है हे लक्षात ठेवलं पाहिजे, असे नाना पटोलेंनी म्हंटले आहे.

...नाहीतर ईडी अजित पवारांना येडं करेल; नाना पटोलेंचे टीकास्त्र
ज्यांचे स्वतःचे कपडे ठिकाणावर नाहीत, त्यांनी...; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार

इंडियाची बैठक होत आहे. राज्यातील राजकीय पक्षाची मूठ बांधली जाणार आहे. देशात एक संदेश देण्याचा काम करण्यात येणार आहे. देशातील हुकूमशहा मोदीचा सरकारला चले जाव असा नारा देणार आहे. सोनिया गांधी सुध्दा येणार आहे. इंडिया बैठकीत कुठलाही वाद नाही, असे नाना पटोलेंनी सांगितले आहे.

महाराष्ट्र संस्कृतीला न शोभणार काल कृत्य बीडच्या सभेत झाला आहे. ज्यांना राजकारणात मोठं केलं तेच टीका करतात. राज्यातील जनतेला हे आवडलेलं नाही. अजित पवारांना भाजप सांगत तसंच‌ बोलावं लागेल. पवारसाहेब म्हणतात ईडीच्या धाकानं गेलेत. त्यांना तसं बोललं नाहीतर ईडी त्यांना येडं करेल, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

इंडियाचे नेते पिकनिकसाठी मुंबईला येत आहेत, असं भाजपा याकरता बोलत आहे. कारण आता त्यांच्यात इंडियाची दशहत आहे. इंडियाला भाजपा घाबरली आहे. म्हणून तर निवडणुका घ्यायला घाबरत आहेत जे काही सर्वे येत आहेत त्यात सर्व ठिकाणी भाजपाच्या जागा कमी होत आहेत. पण, जेवढा निवडणुकीला वेळ लावतील तेवढा भाजपा आणखी खाली खाली जाईल.

मोदींची लोकप्रियता दिंवेसदिवस कमी होत आहेत म्हणून घाबरले आहेत, अशीही टीका पटोलेंनी केली आहे. राष्ट्रवादीमध्ये संभ्रम काय आहे? स्वतः धनंजय मुंडे काय बोलत आहेत? बाप बाप होता है हे लक्षात ठेवलं पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com