दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता जागा दाखवेल : नाना पटोले

दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता जागा दाखवेल : नाना पटोले

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाबाबत नाना पटोलेंनी केले भाष्य

उदय चक्रधर | भंडारा : पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाबाबत दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील सर्व उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट होईल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. जो डाव देवेंद्र फडणवीस आणि भाजपने खेळला होता, तो आता जनतेला कळला असून विशेष करून पदवीधर आणि शिक्षक मतदारांना समजून आला आहे. दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता त्यांची जागा दाखवेल. पाचही जागा महाविकास आघाडी जिंकेल, अशी रणनीती आम्ही केली असल्याची स्पष्टोक्ती नाना पटोले यांनी केली आहे.

दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्या भाजपला जनता जागा दाखवेल : नाना पटोले
अब्दुल सत्तारांना सुळेंबद्दल केलेले 'ते' विधान भोवणार; महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या लढाईतील कुठलीही जागा अदलीबदली होणार नाही. सर्व जागा आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) असे महाविकास आघाडी म्हणून लढविणार असून सर्वच जागांवर आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

काँग्रेसची उमेदवारी अर्ज दाखल न केल्याप्रकरणी काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडताना कुणी काय मत मांडावे, हा त्यांचा प्रश्न आहे. हायकमांडने ही कारवाई केलेली आहे, मला त्यावर बोलायचे नाही, असे म्हणत तांबे प्रकरणावर नाना पटोले यांनी अधिक बोलणे टाळले.

संविधानात न्यायव्यवस्थेवर एक वेगळं स्थान आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही. मोदी सरकार असल्यापासून न्यायव्यवस्थेत सातत्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सुरू असून हे खऱ्या अर्थाने संविधानिक व्यवस्थेसाठी धोका आहे. व्यवस्थेवरही आता जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com