अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर नारायण राणे बॅकफुटवर? मी संजय राऊतांना ओळखतच नाही

अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर नारायण राणे बॅकफुटवर? मी संजय राऊतांना ओळखतच नाही

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

संजय देसाई | सांगली : कोण आहेत संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही, अशा शब्दात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना फटकारले आहे. तसेच संजय राऊत, शिवसेना, मातोश्रीचा विषय संपला आहे, असा टोलादेखील मंत्री राऊत यांनी लगावला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नारायण राणे यांनी भांडुप येथील एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांच्या निवडणुकीसाठी पैसे खर्च केल्याचा आरोप केला होता. यावरून संजय राऊत यांनी न्यायालयात धाव घेत राणेंविरोधात ही याचिका दाखल केली आहे. याबाबत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर नारायण राणे बॅकफुटवर? मी संजय राऊतांना ओळखतच नाही
भाजपविरोधात ठाकरे गटाने थोपटले दंड; कर्नाटक निवडणूक लढवणार?

कोण आहेत,संजय राऊत? मी कोणत्याही संजय राऊतला ओळखत नाही. कोणत्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव घ्या आणि मी कोणत्या सभेला गेलो नाही. मी तसे काही बोललो नाही. व संजय राऊत यांच्या प्रश्नाबद्दल मी उत्तर देणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संजय राऊत, शिवसेना, मातोश्री विषय क्लोज करा. आता काही राहिले नाही. त्यांचा विषय संपला आहे. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आता पुन्हा येणे नाही, असा टोला देखील लगवला आहे.

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान मृत्यूच्या घटनेवर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांचा समाचार घेताना नारायण राणेंनी टीकास्त्र सोडले आहे. खारघर प्रकरण हा निसर्गाचा कोप आहे. ऊन पडलं त्यामुळे ते घडले. पण, विरोधक म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आणि सत्ता गेल्याने निराश व हताश झाले असून त्यांच्या हातात काही राहिला नाही म्हणून टीका करत आहेत. त्याचबरोबर राजकीय परिस्थितीवरून बोलताना महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाही आणि भाजपाचे सरकार टिकेल, असा दावाही मंत्री राणे यांनी यावेळी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com