Narayan Rane
Narayan Rane Team Lokshahi

उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आहेच कुठं, नारायण राणेंचा ठाकरेंवर घणाघात

राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला दिल्या शुभेच्छा

राज्यात सद्यस्थितीत राजकीय वातावरण वेगवेगळ्या विषयावरून रंगलेले असताना, दसरा मेळव्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात जोरदार वादंग सुरु असताना याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमखु उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आहेच कुठं. ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Narayan Rane
मला "देवेंद्र शेट्टी फडणवीस" होयला आवडेल, उपमुख्यमंत्र्यांचे विधान

उद्धव ठाकरेंचे अस्तित्व मातोश्री पुरते मर्यादित

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आहेच कुठं. ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे. अश्या शब्दात राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Narayan Rane
रामदास कदम शरीराने शिंदेंजवळ मात्र, मनाने ठाकरेंजवळच?

पुढे बोलतांनी नारायण राणे यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर देखील विधान केले आहे.त्यांनी एका शब्दात राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला शुभेच्छा दिल्या. सोबत भारत आलेल्या चित्यांवर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, चांगल्या गोष्टींच कौतुक करावं. जे उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिलं. त्यामुळं त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली. पुढे ते म्हणाले की, 2024 साली भाजपला 303 ऐवजी 403 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दौरे सुरू केलेत. अशी प्रतिक्रिया राणेंनी यावेळी दिली.

Lokshahi
www.lokshahi.com