Bhagat Singh Koshyari | Narayan Rane
Bhagat Singh Koshyari | Narayan Rane Team Lokshahi

कोश्यारी लवकरच होणार मुक्त; नारायण राणेंना मिळणार राज्यपालपदाची जबाबदारी?

महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई : भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मला मुक्तता द्यावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यामुळे सध्या दिल्ली दरबारी राज्यपाल बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यपाल पदासाठी आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नावही चर्चेत आले आहे. केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना विचारणा झाल्याची सुत्रांची माहिती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.

Bhagat Singh Koshyari | Narayan Rane
बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या जागी नव्या राज्यपालाची नेमणूक करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर दिग्गज नेत्यांची नावे शर्यतीत आहेत. त्यामुळे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिंदर सिंग, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी येदुरप्पा यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. यात आता नारायण राणे यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून नारायण राणे यांना विचारणा झाल्याची माहिती मिळत आहे. नारायण राणे यांच्याकडे इतर राज्याच्या राज्यपालपदासाठी विचारणा झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, नारायण राणे सध्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. उद्धवा, काय केलंय, रे बाबा अडीच वर्षात. आलास दोनदा मासे खायला. एकतरी प्रकल्प कोकणाला दिला का, अशी टीका त्यांनी आंगणेवाडीच्या जत्रेत केली होती. तर, संजय राऊतांवरही नारायण राणे यांनी शरसंधान साधले होते. याप्रकरणी राणेंविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे राऊतांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com