शिवसेनेच्या पक्षनिधीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेच्या पक्षनिधीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तर, शिवसेनेच्या पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला आता आणखी धक्का मिळण्याची शक्यता आहे. यावर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर येत असून या याचिकेशी आमचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

शिवसेनेच्या पक्षनिधीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका; शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रावणानेही भगवे कपडे घालून सीतेला पळवून नेलं होतं; नाना पटोलेंचा शिंदेंना टोला

शिवसेनेच्या चल आणि अचल मालमत्ता शिंदे गटाला मिळावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. परंतु, या याचिकेशी आमचा काहीही संबंध नाही. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची खरी संपत्ती असून ती आम्हाला पुरेशी आहे, असे शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील वकील आशिष गिरी यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. आशिष गिरी यांनीही कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले होते.

काय आहे याचिकेत?

शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तर, सर्वोच्च न्यायालयानेही यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते बनले आहेत. यामुळे शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावा. शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे मुंबईतील वकील आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com