तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना प्रश्न

तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना प्रश्न

नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात शेतकऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. कर्ज भरण्यासाठी बँकेकडून दिलासा मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? असा थेट प्रश्न राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारला आहे.

तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येता? राज ठाकरेंचा शेतकऱ्यांना प्रश्न
संजय राऊत कोणत्या ब्रँडची मारून भाषण देत होता; नितेश राणेंचा हल्लाबोल

एकीकडे अवकाळीमुळे झालेले नुकसान तर दुसरीकडे बँकेची वसूली शेतकरी अशा दुहेरी संकटात अडकला आहे. अशात, मोठ्या थकबाकीदारांना जिल्हा बँक पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकरी तयार आहेत. मात्र, बॅंकेकडून वेळ देण्याची मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितले.

यावर राज ठाकरे यांनी तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केलं ना? जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता, असे म्हणत शेतकऱ्यांना धारेवर धरले. याचं भान तुम्ही ठेवायला हवं. सगळे मागे आता राज ठाकरे असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. तसेच, येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगतले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंसोबत बैठक संपल्यानंतर एका शेतकऱ्याने त्यांना चाबूक भेट दिला. यानंतर जर त्यांना मतदान केले तर याच्यानेच मारीन, अशी मिश्कील टिप्पणी राज ठाकरेंनी केली. यामुळे हॉलमध्ये एकच हशा पिकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com