संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात; शिंदे गटाचा घणाघात

संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात; शिंदे गटाचा घणाघात

नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

नाशिक : शिवसेनेच्या नाशिक बालेकिल्ल्याला शिंदे गटाने सुरुंग लावला असून चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश केला. यानंतर आज पत्रकार परिषद घेत या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघात केला असून आरोप केले आहेत. संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. तसेच, नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा दाखवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात; शिंदे गटाचा घणाघात
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेंदू गुडघ्यात; मनसेचे टीकास्त्र

शिंदे गटात नुकतेच दाखल झालेले योगेश बेलदार म्हणाले की, संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत. संजय राऊत तुडवा तुडवी काय असते ते तुम्हाला आम्ही दाखवू. कुठे यायचं हे सांगा, असे थेट आव्हानच त्यांनी दिले आहे.

रुपेश पालकर म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात जे गेले त्यांना मी ओळखत नाही. माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे. या मध्यवर्ती कार्यालयावर आम्ही दावा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. संजय राऊत फक्त हिशोब घ्यायला नाशिकला येतात, असेही प्रवीण तिदमे यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात; शिंदे गटाचा घणाघात
आपल्या डोक्यात सत्तेची हवा गेल्यावर आपण काय केलं; महाजनांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तसेच, राऊत शनिवार रविवार फक्त पर्यटनासाठी येतात. शिवसेना हा वटवृक्ष आहे. पण, संजय राऊत बांडगुळ आहेत. बांडगुळ हे वटवृक्ष संपवतात. संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात. त्या दिवशी म्हणतात चप्पल चोर गेले. आम्ही चप्पल चोर नाही. तर खरा देव आदरणीय हिंदुहृदयसम्राट आमच्या सोबत आहेत. तुम्ही स्वतः सरपंच पदाची निवडणूक लढवली नाही. संजय राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नाहीच, अशी विखारी टीका अजय बोरस्ते यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com