मोठी बातमी! अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह!

मोठी बातमी! अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह!

राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सर्वात मोठी राजकीय बातमी समोर आली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाला आहे.

राज्यात कधी नव्हे तेवढे राजकीय वाद सुरु आहेत. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले होते. अजित पवार यांनी बंड पुकारून भाजपसोबत हातमिळवणी केली होती. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह दिलं आहे.

या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उभी फूट पडली. अजित पवार शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत एकत्र येत सत्तेत सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी नेमकी कोणाची हा मुद्दा थेट निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. अशातच आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी अपेक्षेप्रमाणे निर्णय दिला आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com