Navneet Rana | Ravi Rana
Navneet Rana | Ravi RanaTeam Lokshahi

राणा दाम्पत्यांनीही साजरा केला व्हॅलेंटाईन डे; एकमेकांना म्हणाले...

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

आज 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस जागतिक प्रेमदिन म्हणन सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी तरुणाई मोठ्या उत्साहात पाहायला मिळते. प्रत्येक जण आपआपल्या पध्दतीने हा दिवस साजरा करत असतो. त्यातच आज व्हॅलेंटाईन डे दिवशी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने देखील आगळावेगळा पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

सर्वत्र आज प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. त्यातच याच दिवशी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी एकमेकांना खास शुभेच्छा दिल्या आहे. सकाळी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. मात्र, दुपारी एक दीडच्या सुमारास आमदार रवी राणा हे अमरावतीच्या एका कॅफे मध्ये आले व त्यांनी येथेच खासदार नवनीत राणा यांना बोलावले गुलाबाचे फुल देऊन त्यांना व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या व एकत्र कॉफी घेतली. या क्षणांचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com