Video : नवाब मलिक दीड वर्षानंतर जेलबाहेर; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज दीड वर्षांनंतर सुटका झाली आहे. नवाब मलिक आज क्रिटी केअर रुग्णलयाबाहेर येताच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर आज दीड वर्षांनंतर सुटका झाली आहे. नवाब मलिक आज क्रिटी केअर रुग्णलयाबाहेर येताच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मलिकांना देण्यात आला आहे. यादरम्यान मलिकांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास बंदी असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com