कोणाला समर्थन? अजित पवार गटाच्या भेटीनंतर नवाब मलिकांचा मोठा निर्णय

कोणाला समर्थन? अजित पवार गटाच्या भेटीनंतर नवाब मलिकांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिकांची भेट घेतली आहे. तर, सुप्रिया सुळे यांनीही कालच मलिकांची भेट घेतली होती.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची आज अजित पवार गटाच्या नेत्यांनी नवाब मलिकांची भेट घेतली आहे. तर, सुप्रिया सुळे यांनीही कालच मलिकांची भेट घेतली होती. यामुळे नवाब मलिक अजित पवार की शरद पवारांना पाठिंबा देणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच, आता मोठी बातमी समोर येत आहे. नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सुत्रांकडून समजते आहे.

कोणाला समर्थन? अजित पवार गटाच्या भेटीनंतर नवाब मलिकांचा मोठा निर्णय
नाना पटोलेंना कोणत्याही खुर्चीकडे बघण्याची संधीसुद्धा मिळणार नाही; देसाईंचा टोला

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. नवाब मलिकांच्या सुटकेनंतर ते कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु, नवाब मलिक तूर्तास आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे समजते आहे. सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून नवाब मलिक यांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटीगाठी सुरु आहेत. राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी नवाब मलिक यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे जुने सहकारी नवाब मलिक यांना भेटायला आलो होतो. १६ महिन्यानंतर त्यांना २ महिन्याची बेल मिळाली आहे. त्यांचावर उपचार सुरू आहे. विचारपूस करण्यासाठी आम्ही आलो होतो. राजकीय विषयांवर आम्ही एका शब्दनेही चर्चा केली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com