Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

मला डिस्टर्ब करू नका, मंत्रिपद दूर जाईल नाही तर; कोणाला म्हणाले अजित पवार असे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला उत्तर देताना आमदार भरत गोगावले यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यामध्येच बोलण्याचा प्रयत्न.

मागील दोन आठवड्यापासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. त्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला उत्तर देताना आमदार भरत गोगावले यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यामध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावरूनच अजित पवार यांनी भारत गोगावले यांना सुनावले आहे.

Ajit Pawar
या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षाला उघड पडलं - देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले अजित पवार?

तुम्ही मला डिस्टर्ब करू नका नाही तर तुम्हाला माहिती नाही का माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध किती जवळचे आहेत. ते मला जेवढी अडचण निर्माण कराल, तेवढं मंत्रिपद दूर जाईल असा दमही त्यांनी गोगावले यांना भरला. त्यानंतर सभागृहात मात्र हशा पिकाला.

भरत गोगावले तुम्ही मला जेवढी अडचण निर्माण कराल तेवढ मंत्रिपद दूर जाईल असा टोला त्यांना लगावल्यानंतर मात्र सभागृहामध्ये हस्यकल्लोळ माजला. यावेळी अजित पवार यांनी राज्याच्या विकासाबरोबरच मुख्यमंत्र्यांनी आता राज्याच्या धोरणावर लक्ष ठेऊन ते पक्क केले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com