राजकारण
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाला मिळणार? 'या' दिवशी होणार सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेणार आहेत. अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचं शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटलंय. त्याचबरोबर पदाधिकारी हे शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करत असल्याचं ही नमूद केलंय. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलवलं गेलंय. पक्ष चिन्ह आणि पक्षाबाबत ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.