राजकारण
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी पार पडणार आहे.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं.
शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद मागे झालेल्या सुनावणीच्यावेळी अजित पवार गटाने केला होता. दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार असून तीन दिवस ही सुनावणी सुरु राहणार आहे. सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत.