राष्ट्रवादी कुणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी

राष्ट्रवादी कुणाची? आज निवडणूक आयोगात सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड करत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले.
Published by  :
Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी बंड करत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर हा राष्ट्रवादी नेमकी कोणाची मुद्दा आता निवडणूक आयोगात पोहोचला आहे. याच प्रकरणी आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यात अजित पवार गटापेक्षाही कागदपत्रं जास्त असल्याचा दावाही शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत हे बाजू मांडत आहे

मागच्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरुन नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगात आज काय निर्णय होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com