Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

'मी वादात पडणार नाही' निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया

सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

Sharad Pawar
'रात्रीच्या गावठी ब्रँड असेल' राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यातच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, “सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो.” असे ते म्हणाले. त्यामुळे शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com