Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीवर अजित पवारांनी व्यक्त केली शंका

भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ आहे. त्यातच दुसरीकडे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीवरून रान पेटले आहे. त्यातच पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल याबाबत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. पुण्यात बोलत असताना त्यांनी ही शंका व्यक्ती केली आहे.

Ajit Pawar
आधी नगरसेवक म्हणून निवडून यावं, संजय राऊतांवर जोरदार टीका

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

दोन्ही शहरातील स्थानिक नेत्यांची आज भेट घेणार आहे. त्यांनी माझ्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत. तसंच दिवंगत मुक्ता टिळक यांचे पतीही इच्छुक आहेत. त्यांचा निर्णय भाजप घेतील आम्ही त्यात नाक खुपसणे गरजेचं नाही. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवावी अशी इच्छा दोन्ही शहरातील आमच्या कार्यकर्त्यांची आहे, त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का याबाबत मला शंका आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com