Amol Mitkari | Kalicharan Maharaj
Amol Mitkari | Kalicharan Maharaj Team Lokshahi

मिटकरींनी घेतला कालिचरण महाराजांच्या विधानाचा समाचार; म्हणाले, मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी...

कालीचरण हा काही कॅबिनेट मंत्री नाही, तो एक व्हाह्यात माणूस आहे.

काही दिवसांपूर्वी कालिचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ते नेहमी आपल्या विधानाने चर्चेत येत असता. मात्र, यावेळी कालिचरण महाराजांनी हिंदू देवी देवता यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं केले आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amol Mitkari | Kalicharan Maharaj
अनिल परबांची मंत्री अब्दुल सत्तारांवर टीका; म्हणाले, भुखंड ढापणे, महिलांना...

काय म्हणाले अमोल मिटकरी?

कालीचरण हा काही कॅबिनेट मंत्री नाही, तो एक व्हाह्यात माणूस आहे. कालीचरणला हिंदू धर्माबद्दल एवढी आस्था असेल, तर त्याने हिंदू मुलांच्या रोजगाराबाबत बोलावं, हिंदू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, त्यावर बोलावं, अशी संतप्त प्रतितिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. कालीचरणने ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यावरून या व्यक्तीमध्ये संताचे कोणतेही गुण दिसत नाही, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, साध्वी प्रज्ञा असेल किंवा कालीचरण असेल, अशा लोकांना महत्त्व देऊ नये. हा काही खूप मोठा व्यक्ती नाही. एवढी त्याच्यात धमक असेल, तर त्याने पाकिस्तान सीमेवर लढायला जावं. चीनच्या बॉर्डवर जावं, त्यांच्याशी दोन हात करावे. मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी आम्हाला नको त्या गोष्टी शिकवू नये, अश्या शब्दात त्यांनी कालिचरण महाराज यांना सुनावले आहे.

काय म्हणाले होते कालीचरण महाराज?

आपले सर्व देवी-देवता हिंसक आहेत. आपले देवी-देवता मारामारी करणारे आहेत म्हणूनच आपण त्यांची पूजा करतो. छत्रपती संभाजी महाराज, गुरुगोविंद सिंह महाराज, राणा प्रतापजी महाराज यांनी आपल्यासाठी मारामारी केली नसती तर आपण त्यांची पूजा केली असती का? त्यामुळे देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही. असे कालिचरण महाराज काल एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com